घरताज्या घडामोडीकांदा चाळीत युरिया टाकून नुकसान; अज्ञाताविरुद्ध देवळा पोलिसांत तक्रार दाखल

कांदा चाळीत युरिया टाकून नुकसान; अज्ञाताविरुद्ध देवळा पोलिसांत तक्रार दाखल

Subscribe
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलूखवाडी (ता. देवळा) येथील प्रगतिशील शेतकरी कारभारी निकम यांनी त्यांच्या घराजवळील असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच शेतात असलेल्या दोन कांद्याच्या चाळीत जवळपास ५०० ते ६०० क्विंटल उन्हाळ कांदा साठवून ठेवला आहे. या चाळीत त्यांना कोणीतरी युरिया हे रासायनिक खत टाकल्याचे आज रविवारी (दि. १४) निदर्शनास आले. निकम यांनी या घटनेची माहिती तत्काळ देवळा पोलीस ठाण्यात दिली. या दोन्ही कांदा चाळीत युरिया टाकल्यामुळे चाळीतील कांदा खराब झाला आहे. यामुळे त्यांचे जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून , हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कारभारी निकम यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, निकम यांनी सांगितले की, आमच्या भाऊबंदकीत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या विपर्यासातून अशा प्रकाराचा बदला घेतल्याचा संशय व्यक्त केला आहे . ह्या गैरकृत्याची परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -