घरताज्या घडामोडीधक्कादायक! बेड रिकामा असतानही उपचाराअभावी झाला रुग्णाचा मृत्यू

धक्कादायक! बेड रिकामा असतानही उपचाराअभावी झाला रुग्णाचा मृत्यू

Subscribe

ठाणे महापालिकेने तयार केलेल्या कोविड वॉर रूममधून पाठवलेल्या एका रूग्णाला काळसेकर हॉस्पिटलने बेड रिकामा असतानाही परत पाठवल्याने उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठाणे महापालिकेने तयार केलेल्या कोविड वॉर रूममधून पाठवलेल्या एका रूग्णाला काळसेकर हॉस्पिटलने बेड रिकामा असतानाही परत पाठवल्याने उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महापालिकेचा आदेश धुडकावणाऱ्या मुंब्रा येथील काळसेकर रूग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला निर्देश

महापालिकेच्याच एका कर्मचाऱ्यांचे वडील यशवंत कवे हे आरोग्यम रूग्णालयात दाखल होते. कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कोपरीतील कोविड वॉर रूम मार्फत महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत काळसेकर रूग्णालयात बेड उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. सोमवारी त्यांच्यासाठी आयसीयूमध्ये बेड देखील निश्चित करण्यात आला होता, असे असतानाही मध्यरात्री १ वाजता त्यांना काळसेकर रूग्णालयाने बेड देण्यास नकार दिला. रूग्णवाहिका रूग्णालयाच्या बाहेरच अर्धा तास उभी करून ठेवण्यात आली होती. आयसीयूमध्ये बेड उपलब्ध असल्याचे निश्चित केलेले असल्याची विनंती करूनही त्यांच्यावर कोणतेही उपचार न करता प्रवेश नाकारला. दरम्यान, रूग्णवाहिकेतच या रूग्णाचा मृत्यू झाला. या रूग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असं कोविड वॉर रूमच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

महापालिकेने पाठवलेल्या रूग्णांकडून अव्वाच्या सवा बीले घेता येत नाही म्हणून बेड रिकामा असून सुध्दा रूग्णालये नकार देतात, अशा रूग्णालयांवर नियंत्रण ठेवणे हे प्रशासनाचे काम आहे, असे महापौरांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तरी या प्रकरणी प्रशासनाने कारवाई केली नाही तर अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाची साथ असल्याचा गैरसमज लोकांमध्ये निर्माण होऊ, नये त्यामुळे पालिकेने काळसेकर रूग्णालयावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, असे महापौरांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


हेही वाचा – LockDown: प्रवाशांना बेस्ट हेल्पलाईनची मदत; दररोज शेकडो तक्रारींचे निवारण


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -