घरताज्या घडामोडी'शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा'

‘शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा’

Subscribe

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

‘सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक नॅशनललाईज बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील’, असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

ही आहे अतिशय गंभीर बाब

शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्यसरकार आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, असे असतानाही अनेक नॅशनलाईज बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.

- Advertisement -

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, June 23, 2020

 

- Advertisement -

ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे, अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


हेही वाचा – उपेक्षित वर्गाला पैसे देण्यासंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा सुरु – अजितदादा पवार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -