घरदेश-विदेशसुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली वकिलाची नियुक्ती

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली वकिलाची नियुक्ती

Subscribe

माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीकरता सर्व आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी एका वकिलाची नियुक्ती केली आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये नंतर सर्व स्तरातून या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत होती. १४ जून रोजी सुशांत सिंहने वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ३० लोकांचे स्टेटमेंट घेतले. आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एका वकिलाची नियुक्ती या प्रकरणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चिंता वाढली! देशातील बाधितांचा आजचा आकडा धडकी भरणारा

सुब्रमण्यम यांच्या त्यांच्या ट्विटर पोस्टमधून ही माहिती दिली. त्यांनी नमूद केले की, मी ईश्वरन यांना संबंधीत सीबीआय चौकशीकरता पीआयएल तसेच गुन्ह्यातील कागदपत्राची जुळवाजुळव करण्याकरता नियुक्त केले आहे. अॅड. ईश्वरन सिंह भंडारी यांच्या चाचपणीतून हे प्रकरण सीबीआय चौकशीसाठी योग्य मानण्यास मदत होईल.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने या जगाला निरोप देऊन बरेच दिवस उलटून गेले आहे. सुशांतच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मात्र अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण समोर आलेले नाही. सुशांतने अचानक एक्झिट घेतल्याने त्याने खरंच डिप्रेशनमध्ये असल्याने स्वतःचे जीवन संपवले की त्याची कोणी हत्या केली, असे अनेक प्रश्न समोर आले आहे. परंतु पोलीस कोणत्याही ठाम निष्कर्षावर पोहोचलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात अनेकांची चौकशी सध्या होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -