घरमहाराष्ट्रशिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासाठी गुगल प्रशिक्षण

शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासाठी गुगल प्रशिक्षण

Subscribe

कोरोनाच्या प्रभावामुळे राज्यातील शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये योग्य समन्वय साधला जावा. शिक्षकाने केलेले अध्यापन विद्यार्थ्यास समजावे यासाठी राज्यातील शिक्षकांना गुगल क्लासरूमच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या प्रभावामुळे राज्यातील शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थी व शिक्षकांमध्ये योग्य समन्वय साधला जावा. शिक्षकाने केलेले अध्यापन विद्यार्थ्यास समजावे यासाठी राज्यातील शिक्षकांना गुगल क्लासरूमच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पहिल्या टप्यात सरकारी शाळांमधील 40 हजार शिक्षकांना दिले जाणार आहे. शिक्षकांना सोमवारी रात्री 11.55 वाजेपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

पहिल्या टप्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. तंत्रस्नेही, आवड असलेल्या, स्वतःकडे संगणक असलेल्या, लॅपटॉप असलेल्या दोन ऍन्ड्रॉईड मोबाईल असलेल्या सरकारी शाळेतील शिक्षकांनी https://google.addingdimensions.in/Home.aspx या लिंकवर जाऊन नावनोंदणी करायची आहे. पहिल्या टप्यात 40 हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिल्यानंतर पुन्हा तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकास शाळेसाठी आयडी तयार करुन देण्यात येणार आहे. या आयडीच्या सहायाने शिक्षक एकावेळी 250 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन तासिका घेऊ शकणार आहे. या तासिका रेकॉर्ड करुन कधीही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी हे सोईचे होणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी व शिक्षक यांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा, शिक्षकांना विद्यार्थ्यास विविध संदर्भ साहित्य अभ्यासास देता यावे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे, विद्यार्थ्याला शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोईच्यावेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद याच्यातर्फे राज्यातील सर्व शाळा, ज्युनियर कॉलेज यांच्यासाठी गूगल क्लासरुम ही सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -