घरताज्या घडामोडीCorona: आज औरंगाबादमध्ये ६६ नव्या रुग्णांची नोंद, आतापर्यंत ३७० जण मृत्यूमुखी!

Corona: आज औरंगाबादमध्ये ६६ नव्या रुग्णांची नोंद, आतापर्यंत ३७० जण मृत्यूमुखी!

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढ आहे. आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात ६६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजार ५१०वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ हजार ४९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या जिल्ह्यात ३ हजार ६४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात काल ७ हजार ९७५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल दिवसभरात २३३ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७५ हजार ६४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काल दिवसभरात ३ हजार ६०६ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ५२ हजार ६१३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात १० हजार ९२८ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – देशात कोरोनाचा पुन्हा नवा विक्रम, २४ तासांत ३२ हजारांहून अधिक रुग्णांची वाढ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -