घरCORONA UPDATECOVID-19 screening: दहिसरमध्ये हेल्मेटद्वारे स्क्रिनिंग

COVID-19 screening: दहिसरमध्ये हेल्मेटद्वारे स्क्रिनिंग

Subscribe

मुंबईतील दहिसरमध्ये मिशन झिरो अंतर्गत हेल्मेटद्वारे शरीराचे तापमान मोजण्यासाठी स्क्रिनिंग केले जात असून दहिसरमधील गणपत पाटील नगर परिसरात या चाचणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्याद्वारे विभागातील नागरिकांची थर्मल गनद्वारे जवळ जाऊन तपासणी न करता हेल्मेट परिधान केलेले डॉक्टर त्या व्यक्तीपासून ठराविक अंतरावर उभे राहिले तरी त्यांच्या शरीराच्या तापमानाची नोंद त्यांना घेता येते. त्यामुळे या रॅपिड स्क्रिनिंगद्वारे तापाच्या रुग्णांना शोधणे कठीण जात आहे.

मुंबईत मिशन झिरो अंतर्गत हेल्मेटद्वारे स्क्रिनिंग केले जात आहे. यामध्ये कमी वेळात जास्त स्क्रिनिंग केले जाते. कांदिवली, बोरीवली आणि त्यानंतर आता दहिसरमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली आहे. दहिसर मधील गणपत पाटील नगरमध्ये या हेल्मेटद्वारे लोकांचे स्क्रिनिंग केले जात आहे. यामध्ये हेल्मेटवरील सेन्सरच्या माध्यमातून समोर उभ्या असलेल्या अनेकांचे तापमान मोजले जाते. एका ऍपद्वारे हेल्मेट परिधान केलेल्या डॉक्टरच्या मोबाईल समोरील व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाची नोंद होते. आणि कोणत्या व्यक्तीला ताप आहे हे कळते.

- Advertisement -

दहीसारमध्ये गणपत पाटील नगर आणि आयसी कॉलनी याठिकाणी ही मोहीम सध्या राबवण्यात येत असल्याची माहिती आर/ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली आहे. स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी या मोहिमेबाबत समाधान व्यक्त करत यापूर्वी सेरो सर्वेक्षणमधून मोठी लोकसंख्या असलेल्या गणपत पाटील नगरमध्ये संक्रमणाचा भौगोलिक फैलाव जाणून घेण्यात आला होता. आता हेल्मेटद्वारे केल्या जाणाऱ्या चाचणीची मोहीम या भागात होत असल्याने गणपत पाटील नगरसह संपूर्ण दहिसर कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -