घरमुंबईसंसदेच्या Standing Committee वर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती!

संसदेच्या Standing Committee वर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती!

Subscribe

जाणून घ्या, कोणाकडे कोणती कमिटी असणार

राज्यसभेच्या नवीन खासदारांची संसदीय स्टँडिंग कमिटीवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्या देशात भारत-चीन वाद-विवाद सुरू असताना शरद पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवार यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

रंजन गोगोई यांना परराष्ट्र विषयक तर उदयनराजे यांच्याकडे रेल्वे विषयक कमिटीवर नियुक्त करण्यात आले आहे. तसेच मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर चेअरमन म्हणून खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

जाणून घ्या, कोणाकडे कोणती कमिटी असणार

  • विनय सहस्त्रबुद्धे : एचआरडी, चेअरमन.
  • शरद पवार : डिफेन्स कमिटी
  • उदयनराजे : रेल्वे कमिटी
  • प्रियांका चतुर्वेदी : काॅमर्स कमिटी
  • डॉ. भगवान कराड : पेट्रोलियम कमिटी
  • ज्योतिरादित्य सिंधिया : एचआरडी कमिटी
  • रंजन गोगोई : परराष्ट्र विषयक कमिटी
  • राजीव सातव : डिफेन्स कमिटी

कोरोनादरम्यान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे चीन आणि पाकिस्तानसोबत संघर्ष होत असल्यामुळे संरक्षण समितीकडे देशाचे लक्ष असणार आहे. या दोन्ही समित्यांवर मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा कोरोना आणि भारत-चीन हे प्रमुख मुद्दे असल्याने सध्या देशात भारत-चीन वाद- विवाद सुरू आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याकडे संरक्षण कमिटी देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.


MP: कॉंग्रेसच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा! १२ दिवसांत ३ जणांनी सोडला पक्ष
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -