घरCORONA UPDATECorona Update: चिंतेत वाढ; देशात कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला ३१ हजारांचा टप्पा!

Corona Update: चिंतेत वाढ; देशात कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला ३१ हजारांचा टप्पा!

Subscribe

देशात कोरोना व्हायरस कहर कायम आहे. मागील काही दिवसांपासून देशात रोज ४० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत १३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशात सर्वाधिक ४८ हजार ९१६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७५७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या १३ लाख ३६ हजार ८६१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३१ हजार ३५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ८ लाख ४९ हजार ४३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४ लाख ५६ हजार ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

 

२४ जुलै पर्यंत देशात १ कोटी ५८ लाख ४९ हजार ६८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ४ लाख २० हजार ८९८ नमुन्यांच्या चाचण्या शुक्रवारी झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात शुक्रवारी ९ हजार ६१५ नव्या रुग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २७८ जणांना कोरोनाने बळी गेला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ५७ हजार ११७ रुग्णांचा कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १३ हजार १३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ लाख ९९ हजार ९६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – भारतातील कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -