घरताज्या घडामोडीधक्कादायक! बंद खोलीत आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह

धक्कादायक! बंद खोलीत आढळले वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह

Subscribe

बंद खोलीत एका वृद्ध दाम्पत्याचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

बंद खोलीत एका वृद्ध दाम्पत्याचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

पुणे शहरातील गावठाण परिसरातील एका इमारतीत संभाजी बापू शिंदे (७५) आणि शोभा संभाजी शिंदे (७०) हे दोघे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; शिंदे दाम्पत्याला मुलबाळ नव्हते. त्यामुळे दोघेच एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेत राहत होते. त्यामुळे त्यांचे नातेवाईक दर आठवड्याला त्यांच्या घरी येऊन जाऊन होते. त्याचप्रमाणे फोनवरुन देखील त्यांची चौकशी करत होते. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून त्यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे शोभा शिंदेच्या बहिणीची मुलगी त्यांना डबा घेऊन भेटण्यासाठी आल्या. त्या दरवाजा वाजवत होत्या. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. घरामध्ये संभाजी आणि शोभा यांचा कुजलेल्या अवस्थेच मृतदेह पडला होता. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच त्यांच्या मृतदेहाजवळ रक्तदाबाच्या गोळ्या सापडल्या आहेत. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


हेही वाचा – Breaking…धक्कादायक! मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममधील २९ गतीमंद मुलांना कोरोनाची लागण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -