घरताज्या घडामोडीBreaking...धक्कादायक! मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममधील २९ गतीमंद मुलांना कोरोनाची लागण

Breaking…धक्कादायक! मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममधील २९ गतीमंद मुलांना कोरोनाची लागण

Subscribe

मानखुर्द येथील गतीमंद व्यक्तींसाठी असलेल्या शेल्टर होममधील २९ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता या कोरोना विषाणूने मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममध्ये देखील शिरकाव केला आहे. मानखुर्द येथील गतीमंद व्यक्तींसाठी असलेल्या शेल्टर होममधील २९ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या शेल्टर होममधील ८० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे.

मानखुर्द बालसुधारगृह परिसरात गतीमंद व्यक्तींसाठी शेल्टर होम असून त्यात लहान मुलांपासून वयोवृद्ध गतीमंद व्यक्तींनाही ठेवण्यात आले आहे. या सुधारगृहात सध्या २६८ मुल असून त्यातील ८० जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यातील २९ गतीमंद मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामधील बहुतांश व्यक्तींना कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, लागण झालेल्या मुलांमधील काहींना रक्तदाब, मधुमेह आणि क्षयरोगाचाही आजार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ला घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोरोनासह इतर आजार असलेल्या मुलांना तात्काळ रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोणामुळे झाला कोरोना?

या मुलांना कोणामुळे कोरोना झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी या शेल्टर होममध्ये काम करणाऱ्या मुलांना कोरोनाची लागण कोणामुळे झाली? हे अद्याप कळू शकलेले नाही.


हेही वाचा – राज्यात आतापर्यंत २ लाख ७ हजार रुग्ण बरे; १ लाख ४५ हजार रुग्णांवर उपचार सुरु


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -