घरताज्या घडामोडीVIDEO : 'रोते रोते हसना सीखो...', नायजेरियन तरुणाने गायलं बिग बींचे गाणे

VIDEO : ‘रोते रोते हसना सीखो…’, नायजेरियन तरुणाने गायलं बिग बींचे गाणे

Subscribe

एका तरुणाने महानायक अमिताभ बच्चन यांचे 'रोते रोते हसना सिखो...' हे प्रसिद्ध गाणे गायले.

संपूर्ण देशभरात महानायक अमिताभ बच्चन यांचे चाहते आहेत. तसेच त्यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांची देखील चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. मात्र, ही क्रेझ केवळ देशभर राहिलेली नसून देशाबाहेर देखील महानायक अमिताभ बच्चन यांचे चाहते असल्याचे समोर आले आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत एक तरुण महानायक अमिताभ बच्चन यांचे ‘रोते रोते हसना सिखो…’ हे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेहमी रंजक व्हिडीओ शेअर करणारे इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय आहे का व्हिडीओ?

या व्हिडीओमध्ये एक नायजेरिन तरुण गाण गाताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा तरुण केवळ गाणं गात नसून त्यावर त्याला उमजेल अशा पद्धतीने थिरकताना दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत स्पष्टता नसली तरी, कमेंट बॉक्समध्ये एका युजरने या व्हिडीओची यूट्यूब लिंक शेअर करत अशी माहिती दिली आहे की हा व्हिडीओ नायजेरिया मधील आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर तुफान व्हायरल

‘अंधा कानून’ या चित्रपटातील हे गाण महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झाले आहे. या व्हिडीओला ७.५ हजारापेक्षा जास्त Views मिळाले असून जवळपास ८०० लोकांनी यावर कमेंट केली आहे. यावर एका युजरने अशी कमेंट देखील केली आहे की, आताच्या काही गायकांपेक्षाही या तरुणाचा आवाज चांगला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – Sushant Case Live Updates : सीबीआय चौकशीच्या हस्तांतराची मागणी; याचिका पाटणा हायकोर्टात दाखल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -