घरताज्या घडामोडीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी कोसळली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी कोसळली

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावरील तिहेरी तटबंदीपैकी दुसरी चिलखती तटबंदी कोसळली आहे. साधारणपणे ३० ते ४० फूट भागातील ही तटबंदी कोसळल्याची घटना घडली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावरील तिहेरी तटबंदीपैकी दुसरी चिलखती तटबंदी कोसळली आहे. साधारणपणे ३० ते ४० फूट भागातील ही तटबंदी कोसळल्याची घटना घडली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओली झाल्याने समुद्राकडील पूर्वेच्या बाजूने असलेली दुसरी चिलखती तटबंदी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळल्याचे समोर आले आहे.

बुरुजाची डागडुजी करण्याची मागणी

विजयदुर्ग किल्ल्यावरील तिहेरी चिलखती तटबंदी कोसळल्याची बाब कामगारांच्या निदर्शनास आली. त्यानी तातडीने पुरातत्व विभागास सदर गोष्टीची कल्पना दिली. पुरातत्व विभागाकडून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे समुद्रात बुरुजाची पडझड होत आहे. हा बुरुज समुद्राच्या पाण्यात असल्याने या बुरुजाची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी किल्लेप्रेमीकडून केली जात आहे.

- Advertisement -

मुंबईत आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात गेल्या १२ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून १५० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पश्चिम उपनगरावर अधिक परिणाम झाला आहे, असा अंदाज आयएमडी, मुंबईने व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Live Mumbai Rain: आजही मुंबईसह उपनगरात अतिवृष्टी होण्याची शक्यता


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -