घरताज्या घडामोडीबेळगावात रातोरात हटवला छत्रपती शिवरायांचा पुतळा; शिवभक्तांमध्ये संताप

बेळगावात रातोरात हटवला छत्रपती शिवरायांचा पुतळा; शिवभक्तांमध्ये संताप

Subscribe

कर्नाटकातील बेळगाव येथील मनगुत्ती गावात लावण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आला आहे. काल रात्री (७ ऑगस्ट) रोजी हे कृत करण्यात आले. कन्नडीगांच्या या मराठाद्वेषी कृत्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्रातील छत्रपतींचे अनुयायी उद्या म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची बातमी टीव्ही ९ या संकतेस्थळाने दिली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात ग्रामपंचायतीच्या परवानगीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. मात्र कन्नड पोलिसांनी हा पुतळा हटविण्यासाठी ग्रामस्थांवर दबाव आणला. मनगुत्ती येथील शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरुन पोलिसांचा दबाव झुगारून लावला. त्यानंतर कर्नाटक सरकारने रात्रीच्या अंधारत हा पुतळा या ठिकाणाहून हलविला.

- Advertisement -

मनगुत्ती गावातील दुसऱ्या एका गटाने पुतळ्याला विरोध केला होता. त्यांच्या तक्रारीनंतरच हा पुतळा हटविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटक सरकारच्या या शिवद्रोही धोरणाविरोधात शिवप्रेमी आक्रमक पवित्रा घेणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -