घरCORONA UPDATECorona Live Update: देशात २४ तासांत ६४,९३५ रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट ७६.६१...

Corona Live Update: देशात २४ तासांत ६४,९३५ रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट ७६.६१ टक्के

Subscribe

देशात मागील २४ तासांत ६४ हजार ९३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात आतपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्या २७ लाख पार झाली आहे. देशातील सध्या रिकव्हरी रेट ७६.६१ इतका आहे.

- Advertisement -

राज्यात मागील २४ तासांत १६१ नवे कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आढळले असून एका पोलीसाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १४ हजार ९५३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५४ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ११ हजार ९९९ बाधित पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या राज्यात २ हजार ८०० पोलिसांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. २४ तासांत देशात ७८ हजार ७६१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३५ लाख ४२ हजार ७३४वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ६३ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २७ लाख १३ हजार ९३४ रुग्ण रिकव्हर झाले आहे. तसेच सध्या ७ लाख ६५ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


देशात १९ ऑगस्टपर्यंत ४ कोटी १४ लाख ६१ हजार ६३६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १० लाख ५५ हजार २७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


जगभरातील कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत २ कोटी ५१ लाख ६६ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ८ लाख ४६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ कोटी ७५ लाख ७ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात शनिवारी १६ हजार ८६७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ लाख ६४ हजार २८१ झाली आहे. राज्यात शनिवारी एकूण १ लाख ८५ हजार १३१ ऍक्टिव्ह रुग्ण होते. राज्यात शनिवारी ३२८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २४ हजार १०३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१५ % एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -