घरताज्या घडामोडीकृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण

Subscribe

काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे.

काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, सध्या कोणतीही लक्षणे नसल्याने ते पुण्यातील घरातच होम क्वारंटाईन झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी कदम यांच्या कुटुंबातील आमदार मोहनराव कदम यांच्यासह चौघांना कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, डॉ. विश्वजीत कदम यांना गुरुवारी ताप आणि अंगदुखीची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी आपली स्वॅबची तपासणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

‘धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु, अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करुन घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो’ अशी माहिती विश्वजीत कदम यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी विश्वजीत कदम यांना सदिच्छा दिल्या आहेत. ‘विश्वजीत कदमजी आपण कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा. माझ्या सदिच्छा आपल्या सोबत आहेत’, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून लोकप्रतिनिधीही याचा सामना करीत आहेत. आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, विक्रम सावंत, सुमन पाटील, अनिल बाबर यांच्यानंतर आता कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनाही करोनाची लागण झाली आहे. याबाबत विश्वजित कदम यांनी लिहिलेल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ‘माझा पलूस-कडेगाव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा पाठपुरावा, करोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजना, मंत्रालयातील बैठका, भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थितीचे पाहणी दौरे, भारती विद्यापीठ कामकाज अशा धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु, अखेर मला करोना संसर्ग झालाच’!


हेही वाचा – Corona : तर नाशिकमधील खासगी हॉस्पिटल्सची मान्यता रद्द होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -