घरताज्या घडामोडीBreaking: पत्रकार परिषदेत 'रिपब्लिक'वर आरोप, FIR मध्ये मात्र India Today चं नाव

Breaking: पत्रकार परिषदेत ‘रिपब्लिक’वर आरोप, FIR मध्ये मात्र India Today चं नाव

Subscribe

इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी पैसे देऊन आपला टीआरपी वाढून घेतल्याचा आरोप करत या प्रकरणाचा पर्दाफाश मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात त्यांनी चार जणांची अटक झाल्याची आणि काही वृत्तवाहिन्यांची चौकशी करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक या न्यूज नेटवर्कचे नाव घेतले. मात्र प्रत्यक्षात जो एफआयआर नोंदविला गेला आहे. त्यामध्ये मात्र ‘India Today आणि इतर’ असा वृत्तवाहिन्यांचा उल्लेख टाकण्यात आला आहे. आता या इतरमध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाव नंतर येणार का? हे मुंबई पोलीसच सांगू शकतील. तसेच टीआरपीच्या घोटळ्याची माहिती पोलिसांनी २० जून रोजी मिळाली, मात्र टीआरपीत फेरफार हे नोव्हेंबर २०१९ ते मे २०२० पर्यंत सुरु होते. ही बाब देखील एफआयरमधून स्पष्ट होत आहे.

टीव्ही चॅनेल्सचा टीआरपी अधिकृतपणे सांगण्यासाठी भारत सरकारने BARC या कंपनीची नेमणूक केलेली आहे. बार्कने मुंबई आणि महाराष्ट्रात टीआरपी मोजण्यासाठी टीव्हीला बेरोमीटर्स नावाचे डीव्हाईस लावण्याचे काम हंसा रिसर्च ग्रुप प्रा.लि. या कंपनीला दिला होते. मात्र या कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी वृत्तवाहिन्यांशी संगणमत करुन टीआरपी घोटाळा केला असल्याचे एफआयरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हे वाचा – परमबीर सिंग तुम्हाला गणवेश घालण्याचा अधिकार नाही’; ठाकरे – शरद पवारांवर अर्णबची आगपाखड

FIR मध्ये नक्की काय लिहिलंय?

हंसा रिसर्चचे डेप्युटी जनरल मॅनेजर नितीन काशीनाथ देवकर यांचा जबाब एफआयआरमध्ये नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार २० जूनला सहायक पोलीस निरीक्षक काझी यांनी देवकर यांना संपर्क साधून हंसाचे कर्मचारी गैरकृत्य करत असल्याचे सांगितले. त्यानुसार हंसाचे रिलेशनशिप मॅनेजर विशाल वेद भंडारी यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून काही विशिष्ट टीव्ही चॅनेलस्चा टीआरपी वाढविण्यासाठी बेरोमीटर बसविलेल्या ग्राहकांना पैशांचे आमिष दाखवून इंग्रजी वाहिन्या बघण्यासाठी उद्युक्त केले. यासाठी ग्राहकांना दरमहा काही पैसे दिले जायचे.

- Advertisement -

बेरोमीटर लावलेल्या घरांमध्ये विशिष्ट चॅनेल्स दिवसभर सुरु असल्यामुळे साहजिकच त्यांचा टीआरपी अधिक दाखविला गेला. यामुळे BARC कडून वाढलेली रेटिंगचा फायदा घेऊन चॅनेल्स जाहिरातीद्वारे कोट्यवधीची माया जमवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या चुकीच्या टीआरपीमुळे BARC आणि जाहीरातदार या दोघांचेही आर्थिक नुकसान झाले असल्याचे देवकर यांनी आपल्या जबाबात सांगितले आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी विशाल भंडारी याचा कारनामा ११ जून रोजीच हंसा कंपनीच्या सर्वेक्षणात समोर आला होता. दि. १७ जूनला BARC च्या मुंबईतील कार्यालयात त्याची झाडाझडती घेण्यात आली होती. यामध्ये त्याने आपला गुन्हा कबूल करत सांगितले की, “नोव्हेंबर २०१९ रोजी एका विनय नावाच्या इसमाने त्याला फोन करुन मुंबईत ज्या घरांमध्ये बेरोमीटर लावलेले आहेत. त्या ठिकाणी कमीत कमी ५ लोकांना इंडिया टुडे हे न्यूज चॅनेल रोज २ तास पाहण्यास सांगावे”, असे सांगितले. याकरिता विनयकडून विशाल यास आर्थिक नफा मिळणार होता. जे ग्राहक इंडिया टुडे चॅनेल पाहतील त्यांना देखील कमिशन मिळण्याचे आमिश दाखविण्यात आले.

हा टीआरपीचा गोरखधंदा नोव्हेंबर २०१९ ते मे २०२० पर्यंत सुरु होता, अशी माहिती अटक करण्यात आलेला आरोपी विशाल यानेच दिली आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्यात विनय याच्या जागी नवीन माणूस विशालला फोन करुन कमिशनचे पैसे देत होता.

Mumbai Police fir copy trp scam 2

भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला असून त्यांनी एफआयआरची प्रत शेअर केली आहे. रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी देखील मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा दावा काल खोडून काढताना त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची याचिक दाखल करणार असल्याचे सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -