घरदेश-विदेशचीनचा धक्कादायक दावा; थंड पदार्थांच्या पॅकिंगवर आढळले कोरोनाचे जीवंत विषाणू!

चीनचा धक्कादायक दावा; थंड पदार्थांच्या पॅकिंगवर आढळले कोरोनाचे जीवंत विषाणू!

Subscribe

अन्न पदार्थांच्या पॅकिंगच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असून देशात सध्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७५ लाखाच्या घरात पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये ६१ हजार ८७१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून १०३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर लस निर्मितीचं काम सुरू आहे. दरम्यान कोरोना संदर्भात नवीन माहिती समोर आली असून फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या पॅकिंगवर कोरोनाचे जीवंत विषाणू आढळून आले आहे. हे निरीक्षण चीनमधील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने केले असून फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या आवरणावर कोरोनाचे जीवंत विषाणू असल्याचा दावा केला आहे.


Corona : त्वचेत ९ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो कोरोनाचा विषाणू; तज्ज्ञांचा खुलासा


चीनमधील किनारपट्टी भागात असलेल्या किंगदाओ शहरात हे निरीक्षण आढळून आले आहे. तर या पदार्थांच्या पॅकिंगच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने सांगितले आहे. किंगदाओ शहरात या महिन्यात अनेक कोरोना रुग्ण आढळून आले. यात परदेशातून आलेल्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रुग्णालयाशी संपर्क येणारे रुग्ण अधिक आहेत.

- Advertisement -

सीफूडला चीनने घातली बंदी

दरम्यान चीनकडून सातत्याने असे सांगितले जात आहे की, परदेशातून शीतपदार्थ आयात करण्यामुळे कोरोना वाढीचा धोका अधिक असून गेल्या काही महिन्यांपासून चीनकडून याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. यापूर्वी काही देशांमध्ये अशा पदार्थांच्या पॅकिंगची तपासणी करण्यात आली होती. ज्यात कोरोना विषाणू असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर इंडोनेशिया आणि ब्राझीलमधील सीफूडला चीनने बंदी घातली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ही बाब फेटाळली

थंड अन्न पदार्थांच्या पॅकिंगवर कोरोना विषाणू आढळून आले असल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने ही बाब फेटाळून लावलेली आहे. अन्न पदार्थांच्या पॅकिंगच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -