घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये पित्याने दोन मुलाची हत्या करुन केली आत्महत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये पित्याने दोन मुलाची हत्या करुन केली आत्महत्या

Subscribe

पोटच्या दोन लहान मुलांची हत्या करुन पित्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येचा कारण अस्पष्ट आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तपास सुरु आहे.

पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथे वडिलांनी पोटच्या दोन मुलांची हत्या करुन आत्महत्या केली आहे. शनिवारी दुपारी नृसिह कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी कामावरुन घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

मुलांच्या हत्येनंतर पित्याची आत्महत्या

दिपक बरमल असे या पित्याचे नाव असून त्याने आधी १० वर्षाचा शुभम आणि ८ वर्षाच्या रुपम या दोन मुलांची गळ्या आवळून हत्या केली. त्यानंतर दिपक याने गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी हे तिघे जण घरामध्ये होते. तर दिपक यांची पत्नी कामावर गेली होती. त्या घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

- Advertisement -

हत्या आणि आत्महत्येचे कारण अस्पष्ट

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर दोन्ही मुलांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दिपक यांनी मुलांची हत्या आणि त्यानंतर आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून तपास सुरु आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -