घरदेश-विदेशविकृत! नवरा करायचा कोंबड्यांसोबत सेक्स, पत्नी करायची शूटिंग!

विकृत! नवरा करायचा कोंबड्यांसोबत सेक्स, पत्नी करायची शूटिंग!

Subscribe

माणसाच्या विकृतीच्या परिसीमा गाठणाऱ्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. मात्र, या घटनेमुळे पोलीसच नाही तर न्यायालय देखील हैराण झालं आहे. आपल्याच घराच्या तळघरात पत्नीला व्हिडिओ शूटिंग करायला लावून एक विकृत व्यक्ती कोंबड्यांसोबत सेक्स करत असल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. हे शूट केलेले व्हिडिओ नंतर हा विकृत विकत असल्याचं देखील समोर आलं आहे. या विकृताला न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र, पती आपल्यावर कौटुंबिक हिंसा करत असल्याचं सांगितल्यानंतर न्यायालयाने पत्नीला सोडून दिलं आहे. मात्र, या घटनेमुळे पुरूषी विकृतीची परिसीमा गाठल्याचं सांगत सोशल मीडियावर देखील तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. हा सगळा प्रकार ब्रिटनच्या ब्रॅडफोर्डमध्ये घडला आहे.

विकृताची पत्नी देखील सहभागी

ब्रॅडफोर्डमध्ये राहणाऱ्या या ३७ वर्षीय विकृताचे अनेक व्हिडिओ पोलिसांना त्याच्या घरी मारलेल्या छाप्यामध्ये हाती लागले आहेत. या व्हिडिओमध्ये हा इसम घरातल्या पाळीव कोंबड्यांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं दिसत आहे. या प्रकारामध्ये अनेक कोंबड्यांचा मृत्यू देखील झाल्याचं दिसून आलं आहे. यातल्या काही व्हिडिओंमध्ये या विकृताची पत्नी देखील त्याच्यासोबत दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे व्हिडिओ नंतर बाजारात विकले जात होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर लंडन पोलिसांनी विकृताला आणि त्याच्या पत्नीला अटक केली.

- Advertisement -

या प्रकरणात निकाल देताना न्यायालयानं नमूद केलं की, ‘आरोपीने केलेला प्रकार हा अत्यंत नीच, अश्लाघ्य आणि विकृत आहे. त्याचा गुन्हा समाजातल्या कोणत्याही योग्य विचारांच्या व्यक्तीला मान्य होणार नाही’. या विकृताच्या पत्नीने आपल्या पतीचे गुन्हे मान्य केले आहेत. मात्र, पती कौटुंबिक हिंसा करत आपल्याला मारहाण करत होता, असं या महिलेने न्यायालयाला सांगितल्यानंतर तिला सोडून देण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -