घरक्राइम'ति'ला अचानक काहीतरी झालं आणि ५ मुलांना छतावरून खाली फेकलं!

‘ति’ला अचानक काहीतरी झालं आणि ५ मुलांना छतावरून खाली फेकलं!

Subscribe

घरात टीव्ही पाहणाऱ्या ५ लहान मुलांना एका महिलेने अचानक छतावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडच्या साहिबगंज भागामध्ये हा प्रकार घडला असून त्यामुळे परिसरात सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आसपासच्या लोकांनी मुलांचा आरडाओरडा ऐकून लागलीच त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने यातल्या तिघांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं. मात्र, दोन मुलांना यात गंभीर इजा झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही सगळी मुलं घरात टीव्ही पाहात होती. अचानक सदर महिला समोर आळी आणि तिने पाचही मुलांना छतावर नेलं. त्यानंतर सर्व मुलांना एकेक करून छतावरून खाली फेकून दिलं. या घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. सदर महिलेचं नाव शर्मिला असून तिचं या मुलांशी असलेलं नातं मात्र अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. या घटनेमध्ये १० आणि १२ वर्षीय दोघे मुलं गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, मुलांना वाचवण्यासाठी आलेली एक महिला आणि एक युवक देखील जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, सदर महिला ही मानसिक आजाराने त्रस्त असून तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच, मानसिक आजाराचा झटका आल्यामुळेच तिच्याकडून हा प्रकार घडल्याचं देखील तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान, सदर महिलेवर पोलिसांकडून काय कारवाई केली जाईल, याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -