घरक्रीडाIND vs AUS : टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे पारडे जड - वसिम अक्रम 

IND vs AUS : टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे पारडे जड – वसिम अक्रम 

Subscribe

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजांची फळी सध्या जगात सर्वोत्तम आहे, असे अक्रमला वाटते.    

भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. खासकरून या दोन बलाढ्य संघांमधील कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी विराट कोहलीच्या भारतीय संघाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदा मात्र कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असेल, असे पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमला वाटते.

माझ्या मते, ऑस्ट्रेलियाची गोलंदाजांची फळी सध्या जगात सर्वोत्तम आहे. त्यांच्याकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड आणि इतरही उत्कृष्ट गोलंदाज आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात चांगला खेळ करेल आणि ऑस्ट्रेलियाला नक्कीच झुंज देईल. मात्र, या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असेल असे मला वाटते, असे अक्रमने सांगितले.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असले तरी भारतीय संघाकडूनही अक्रमला खूप अपेक्षा आहेत. भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. ९० च्या दशकात आम्ही (पाकिस्तान संघ) ज्याप्रकारे मैदानात उतरायचो आणि वावरायचो, तेच मला आताच्या भारतीय संघात दिसते. ते कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. भारताचे खेळाडू आता थोडे बदमाश झाले आहेत, असे अक्रम गमतीत म्हणाला.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे १७ डिसेंबरपासून खेळला जाईल. त्यानंतरचे कसोटी सामने मेलबर्न (२६-३० डिसेंबर), सिडनी (७-११ जानेवारी २०२१) आणि ब्रिस्बन (१५-१९ जानेवारी २०२१) येथे होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -