घरमुंबईबोले तो सर्किटचं ट्विटर अकाऊंट झालं 'शॉर्ट सर्किट'!

बोले तो सर्किटचं ट्विटर अकाऊंट झालं ‘शॉर्ट सर्किट’!

Subscribe

अभिषेक बच्चन नतंर अभिनेता अरशद वारसीचे ट्विटर अकाऊंट हॅक. तुर्की हॅकर्सने केले अकाऊंट हॅक.

बॉलिवूडमधील सर्किट म्हणजेच अरशद वारसीचं ट्विटर अकाऊंट काही हॅक झाले होते. मात्र आता सर्व ठीक असल्याचं ट्विट त्यांने केले आहे. “ट्विटरवरुन काही अज्ञात मजकूर माझ्या माहितीशिवाय पाठवल्या गेल्यामुळे अकाऊंट हॅक झाल्याचे समजले.” असे ट्विट अरशदने केले. पासवर्ड बदलल्याने अकाऊंट पुन्हा सुरळीत झाल्याचे ही त्याने सांगितले. मात्र आपल्या अधिकृत ट्विटरवरुन काही आक्षेपार्ह संदेश जाऊ नये याची भिती अरशदला होती. बॉलिवूड कलाकारांची अधिकृत ट्विटर अकाऊंट्स हॅक करण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही अभिनेता अभिषेक बच्चन आणि अनुपम खेर यांची ट्विटर अकाऊंट्स हॅक झाली होती. देशाबाहेरुन ही अकाऊंट्स हॅक केली जात असल्याचे पोलिसांच्या सायबर सेल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

- Advertisement -


ट्विटरवरून कोणताही मजकूर ट्विट केला नाही तरीही अकाऊंटवर ट्विट जात असल्याचे अरशदरच्या लक्षात आले. त्याने याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. तसेच खबरदारी म्हणून अकाऊंटचा पासवर्ड बदलला. तुर्की-हॅकर्सने अरशदचे अकाऊंट हॅक केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या मदतीसाठी अरशदने पोलिसांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

 


यापूर्वीही अभिनेता अभिषेक बच्चनचे अकाऊंट हॅक झाले होते. यानंतर काही दिवासांनी अभिषेकने आपले अकाऊंट हॅक झालेचं ट्विट केलं होतं. जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यांनी ट्विट करुन आपण शेअर केलेले ट्विट न बघण्याचा सल्ला फॉलोअर्सला दिला होता. पासवर्ड रिसेट केल्यानंतर त्यांनी पुन्हा आपण ट्विटरवर आल्याची माहिती दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -