घरमहाराष्ट्रप्रताप सरनाईक क्वारंटाईन; पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची ईडीला विनंती

प्रताप सरनाईक क्वारंटाईन; पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची ईडीला विनंती

Subscribe

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. प्रताप सरनाईक यांनी पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती ईडीला केली आहे. परदेशातून आल्यामुळे क्वारंटाईन आहे, त्यामुळे चौकशीला येऊ शकत नाही, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीला केली आहे. ईडीने मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. आज प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.

मुंबई बाहेरून आल्यामुळे कोरोनाच्या नियमांनुसार आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाइन झाले आहेत. त्यांनी ED ला विनंती केली आहे की, विहंग सरनाईक यांच्या पत्नी हायपर टेंन्शनमुळे ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. विहंग त्याच्या पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे विहंग आणि मला पुढच्या आठवड्यात एकत्र चौकशीसाठी ED ने बोलवावे, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी ED च्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. ED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.

- Advertisement -

२४ नोव्हेंबरला सकाळी ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला होता. दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या १० ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर होण्याची सूचना ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तथापि, प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ही आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. सोमवारी विहंग यांची ६ तास चौकशी केली होती. सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे. आता सरनाईक हे क्वारंटाइन झाले आहे, त्यामुळे ईडी काय भूमिका घेते हे पाहण्याचे ठरणार आहे.

‘शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात राजकीय हेतूने प्रेरित कारवाई सुरू केली, हे दुर्दैवी आहे. शासकीय तपास यंत्रणांचा अशा प्रकारे गैरवापर होणे योग्य नाही. शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष श्री. सरनाईक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या तपासातून ते सहीसलामत बाहेर पडतील, असा मला विश्वास आहे.’
एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री, ठाणे जिल्हा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -