घरताज्या घडामोडीलवकरच 'अपने २'चा सिक्वल येणार

लवकरच ‘अपने २’चा सिक्वल येणार

Subscribe

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी 'अपने २' सिक्वलबाबत जाहीर केले

बॉलिवूडचे देओल कुटुंब पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. फॅमिली ड्रामा फिल्म ‘अपने’चा सिक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी ट्विटद्वारे याबाबत जाहीर केले आहे. धर्मेंद्र यांनी ट्विट करून सांगितले आहे की, ‘सर्व हितचिंतकांच्या आशीर्वादाने ‘अपने २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.’ या ट्विटसोबत धर्मेंद्र यांनी एक छोटासा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘अपने’ चित्रपटाचे गाणं आहे.

- Advertisement -

२००७ साली ‘अपने’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धर्मेंद्र आणि त्यांची मुलं सनी देओल आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. याशिवाय महिला मुख्य भूमिकेत अभिनेत्री शिल्पा शेट्टी, कॅटरिना कॅफे आणि किरण खेर होती. ‘अपने’ हा चित्रपट आणि त्यातील गाणी खूप सुपरहिट झाली होती.

या चित्रपटात एका अशा वडिलांची कहानी आहे, जे आपल्या मुलाला बॉक्सिंग चॅम्पियन बनवू इच्छित असतात. पण हे स्वप्न पूर्ण होत होऊ शकत नाही. त्यांच्या छोट्या मुलगा बॉक्सिंग रिंगमध्ये घायाळ होतो आणि त्यांच्या मोठ्या मुलगा आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. या चित्रपटात पूर्णपणे फॅमिली ड्रामा आहे. यासोबत चित्रपटात देशभक्तीची भावना देखील दाखवली आहे.

- Advertisement -

‘अपने’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. या चित्रपटाने परदेशात चांगलीच कमाई केली होती. देओल कुटुंबाचा हा चित्रपट हिट झाल्यानंतर धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल यांनी ‘यमला पगला दीवाना’ चित्रपटात एकत्र काम केले होते.


हेही वाचा –  ‘आशिकी’ फेम राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका, नानावटी रुग्णालयात केलं दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -