घरमहाराष्ट्रनागपूरमधील 'मिहान' प्रकल्पातून तब्बल ५४ हजाराहून अधिक जणांना नोकऱ्या

नागपूरमधील ‘मिहान’ प्रकल्पातून तब्बल ५४ हजाराहून अधिक जणांना नोकऱ्या

Subscribe

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा मतदारसंघ नागपूर येथे एका प्रकल्पाद्वारे ५४ हजाराहून अधिक जणांना नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या. नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी मल्टी-मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट अॅट नागपूर (Multi-Model International Cargo Hub and Airport at Nagpur) म्हणजेच मिहान प्रकल्पातून ५४ हजाराहून अधिक जणांना नोकरी मिळाली आहे. नागपूर, विदर्भाचा विकास आणि स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी सुरु करण्यात आलेला प्रकल्प यशस्वी झाला आहे. यामुळे २०१४ च्या निवडणुकीत नितीन गडकरी यांनी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करुन दाखवले आहे.

भौगोलिक स्थितीमुळे नागपूर हे वायू आणि रेल्वे वाहतुकीसाठी महत्वपूर्ण शहर आहे. अशास्थितीत नितीन गडकरी यांनी नागपूर आणि विदर्भाला आर्थिक केंद्र बनवण्यासाठी ‘मल्टी-मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अॅन्ड एअरपोर्ट अॅट नागपूर’ या प्रकल्पाची सुरु केली. २००९ पासूनच गडकरी या प्रकल्पाच्या कामाला लागले होते. २०१४ ची लोकसभा निवडणूक गडकरींनी जिंकली आणि ते मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंत्री झाले. त्यानंतर गडकरींनी आपला महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिहान पुन्हा उभारी देण्यावर लक्ष केंद्रीय केले. त्यावेळी अनेक मोठ्या कंपन्यांनी मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली.

- Advertisement -

‘मिहान’ अंतर्गत रोजगार

थेट रोजगार (सेझ) -१६,९१५

- Advertisement -

अप्रत्यक्ष रोजगार (सेझ) -१९४९२

एकूण- ३६,४०७

थेट रोजगार (नॉन सेझ) -४२०२

अप्रत्यक्ष रोजगार (नॉन सेझले) -११९६०

एकूण – १६,१६२

केंद्रीय सुविधा इमारत – मिहान सेझ- २२९९

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -