घरमुंबईमनपाच्या भोंगळ कारभाराचा फटका लहान मुलांना बसणार

मनपाच्या भोंगळ कारभाराचा फटका लहान मुलांना बसणार

Subscribe

उच्च दबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणार्‍या उद्यानांमध्ये पाऊस सुरु असताना अनेक शॉक सर्किटच्या घटना घडतात. त्यामुळे शहरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणार्‍या उद्यानातील खेळणी आणि आसन व्यवस्था हटवण्याचा निर्णय पालिकेच्या उद्यान विभागाकडून घेण्यात आला आहे.

उच्च दबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणार्‍या उद्यानांमध्ये पाऊस सुरु असताना अनेक शॉक सर्किटच्या घटना घडतात. त्यामुळे शहरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणार्‍या उद्यानातील खेळणी आणि आसन व्यवस्था हटवण्याचा निर्णय पालिकेच्या उद्यान विभागाकडून घेण्यात आला आहे. एरोली येथे उच्च दबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणार्‍या उद्यानांमध्ये महापारेषणच्या कपलिंगचा तुकडा महिलेच्या डोक्यात पडून ती जखमी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली असणार्‍या 25 उद्यानांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आला आहे.

महापारेषणने उच्च दाबाबच्या विद्युत वाहिनीखाली कोणतेही काम करु नये अशा सूचना दिलेल्या आहेत. तरी अशा ठिकाणी अतिक्रमण होऊ शकते, या भीतीने पालिकेने त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करुन उद्यान विकसित केली आहेत. मात्र आता महापारेषणच्या सूचनांची दखल पालिकेने घेतली आहे .याबाबत नुकतीच पालिका आयुक्त, उद्यान अधिकारी आणि शहर अभियंता यांनी उच्च दाब विद्युत वाहिन्यांखाली असणार्‍या उद्यानाच्या नियोजनाबाबत चर्चा केली. तसेच सुरक्षेच्यादृष्टीने योग्य उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील असणार्‍या उद्यानांमध्ये रिमझिम पावसात शॉक लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महापारेषण विभागाने पुन्हा एकदा महापालिका आणि सिडकोला अति उच्च दबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्याने नागरिकांच्या वापरासाठी बंद करण्याचे कळवले आहे. त्यावर पालिका आयुक्तांनी उद्यान आणि अभियांत्रिकी विभागाच्या अधिकांर्‍यासोबत चर्चा केली.

- Advertisement -

अति उच्च दबाच्या विद्युत वाहिन्यांखालील उद्यानाने बंद केल्यास त्यावर झालेला खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही उद्याने बंद करण्याऐवजी उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्याखालील असणारी लहान मुलांची खेळणी त्याचप्रमाणे बॅचेस हे उद्यानातच दुसर्‍या ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे उद्यानामध्ये येणार्‍या नागरिकांसाठी सुचनांचे फलक लावण्यात येणार आहे.शहारातील सुमारे पंचवीस उद्याने अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्याखाली आहेत. त्यापैकी ऐरोली येथील काम सुरु असलेल्या उद्यानात दोन ऑगस्टला दुर्घना घडली.

उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील भुखंडावर कोणत्याही प्रकाराचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी उद्याने साकरण्यात आलेली आहेत. त्यामुळे उद्यानातील खेळणी,आसन व्यवस्था आणि नागरिकांना चालण्यासाठी पदपथ देखील विद्युत वाहिन्यांच्या खाली न करता ते इतर ठिकाणी करण्यात येणार आहेत. याशिवाय पावसाळ्यात उद्यानात फिरू नये यासाठी सूचना फलक लावण्यात येणार आहेत.अतिक्रमणाला आळा बसवा यासाठी उच्च दाब विद्युत वाहिन्यांखाली उद्याने विकसित करण्यात आली आहेत
-नितीन काळे, उपआयुक्त उद्यान विभाग, नमुंमपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -