घरमुंबईमुंबईचा नारळफोड्या; शहराची परंपरा जपणारा टॅक्सीवाला

मुंबईचा नारळफोड्या; शहराची परंपरा जपणारा टॅक्सीवाला

Subscribe

सन आयलाय गो नारली पुनवेचा... नारळी पौर्णिमेच्या दिवशी वाजणारे गाणे आणि सोबतीला नारळफोडीची स्पर्धा ही जुन्याजाणत्या कोळी बांधवांच्या खर्‍या मुंबईची परंपरा आज काळाच्या ओघात काहिशी लुप्त होत असली तरी काही अवलिये ती जपण्याचा प्रयत्न करत आहेत.

सन आयलाय गो नारली पुनवेचा… नारळी पौर्णिमेच्या दिवशी वाजणारे गाणे आणि सोबतीला नारळफोडीची स्पर्धा ही जुन्याजाणत्या कोळी बांधवांच्या खर्‍या मुंबईची परंपरा आज काळाच्या ओघात काहिशी लुप्त होत असली तरी काही अवलिये ती जपण्याचा प्रयत्न करत आहेत. ५३ वर्षीय टॅक्सीचालक दीपक जगनाडे हे त्यापैकीच एक. त्यांच्या नारळफोडीच्या प्रेमामुळे ते नारळपौर्णिमेच्या दिवशी 150 नारळ जिंकून नेहमीच कौतूकाचा विषय ठरतात.
शनिवारी टॅक्सी चालवत असताना काळाचौकी येथे जगनाडे यांना नारळफोडीची स्पर्धा होत असल्याची दिसली. घाईघाईने त्यांनी प्रवाशांना मुंबई सेंट्रलला सोडले आणि त्वरित नारळ फोडी स्पर्धेच्या ठिकाणी आले. फटाफट २५ नारळ जिंकले आणि मार्गाला लागले.

माझगाव येथे राहणार्‍या जगनाडे यांच्याकडे नारळफोडण्याचे कौशल्य अनोखे आहे. प्रतिस्पर्ध्याच्या हातातील नारळ फोडताना तो कसा फोडावा. चुकून हातावर नारळ आपटणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. हातात नारळ कसा धरावा? कोणत्या भागावर मारल्यावर तो फुटतो, हे जगनाडे यांना सराव आणि निरीक्षणातून समजल्याने ते या स्पर्धेतील किंग ठरले आहेत.तर आज नीलिमा स्ट्रीट येथे होणार्‍या मोठ्या नारळी स्पर्धेत जिंकायचं, असा पण त्यांनी केला आहे. मुंबईभरात नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडीची स्पर्धा घेण्यात येते. पण या स्पर्धेचा उत्साह पहिल्यापेक्षा कमी झाला आहे. दक्षिण मुंबईत काही भागात या खेळांनी हा जोर अजूनही टिकून ठेवला आहे. दीपक जगनाडे वर्षातून या नारळी पौर्मिणेची आतुरतेने वाट पहात असतात. दीपक यांच्यासारख्या रसिकांमुळे ही स्पर्धा अजूनही जिवंत आहे. माझगाव येथे मराठी सण साजरे केले जातात आणि मराठी सणांचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

लहानपणापासून नारळफोडी हा माझ्या आवडीचा खेळ आहे. जास्त नारळ जिंकायचे आणि ते चाळीमध्ये वाटायचे हा त्या दिवसाचा माझा दिनक्रम असतो. या दिवसात विविध भागातील स्पर्धेत सहभागी होऊन कमीत कमी १५० नारळ जमा होतात. २००३ साली जय हिंद टॉकीज जवळ झालेल्या स्पर्धेत बक्षीस पटकावले होते. त्यात तीन हजारांचे पारितोषिक मिळाले होते. २००९ साली गणेश टॉकीज येथे २ रा क्रमांक पटकावला होता असे दीपक यांनी सांगितले. भायखळा, काळाचौकी, लालबाग, परेल या भागाची कामगार वस्ती अशी ओळख होती. मात्र टोलेजंग इमारती, हद्दपार झालेला मराठी माणूस यामुळे या भागात रुजलेली मराठी संस्कृती कमी होत आहे. मात्र, दीपक यांच्या सारख्या हौशी नागरिकांमुळे या स्पर्धा जिवंत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -