घरताज्या घडामोडीसैफ अली खानच्या 'तांडव'चा टीझर प्रदर्शित

सैफ अली खानच्या ‘तांडव’चा टीझर प्रदर्शित

Subscribe

सैफ अली खानची 'तांडव' वेबसीरिज १५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

सध्या चर्चेत असलेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची नवी वेबसीरिज ‘तांडव’चा टीझर रिलीज झाला आहे. सैफ अली खानची ही वेबसीरिज Amazon प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. राजकीय नाट्यमय अशी ही वेबसीरिज असून अली अब्बास जफरने दिग्दर्शित केली आहे. हिमांशु मेहरा आणि अली अब्बास या दोघांनी मिळून वेबसीरिजची निर्मिती केली आहे. सैफ अली खानची ही नवी वेबसीरिज १५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सध्या ‘तांडव’चा टीझर चांगलाच चर्चेत आला आहे.

‘तांडव’च्या टीझरची सुरुवात जबदरस्त गर्दी आणि राजकीय झेंडापासून झाली आहे. सैफ अली खान यामध्ये राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘तांडव’च्या टीझरमध्ये सैफ अली खानची दमदार एंट्री दाखवली आहे. त्याच्या एंट्रीच्या ब्रॅकग्राऊंडला ‘हिंदुस्तान को सिर्फ एक ही चीज चलाती है, राजनीति. इस देशमध्ये जो प्रधानमंत्री है वौ ही राज है’, असा वॉइस ओव्हर आहे.

- Advertisement -

सैफ अली खान ‘तांडव’ मध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या व्यतिरिक्त डिंपल कपाडिया, तिग्मांशू धूलिया, सुनिला ग्रोवर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच जिशान अयूब खान, कृतिका कामरा, कुमूद मिश्रा, गौहर खान, अनूप सोनी, सारा-जेन डियास, कृतिका अवस्थी, डीना मोरिया आणि परेशा पहुजा आहे. ‘तांडव’ वेबसीरिजनिमित्ताने डिंपल कपाडिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे.

या वेबसीरिजबाबत अली अब्बास जफर यांनी सांगितले की, ‘तांडवच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना राजकारणातील सत्तेसाठी भुकलेल्या जगात नेऊ. जसा तुम्ही शो पाहाल, तर तुम्हाला लक्षात येईल की, कोणी योग्य आणि चुकीचे नाही आहे, कोणी काळा आणि पांढरा नाही आहे. आपल्याला ग्रे शेड्स पाहायला मिळेल. माझी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मवरील ही सुरुवात आहे, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे.’

- Advertisement -


हेही वाचा – रश्मि रॉकेट: तापसीने घेतलेली मेहनत बघून व्हाल हैराण


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -