भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लग्नबंधनात अडकला आहे. युट्यूबर धनश्री वर्मासोबत चहलने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. चहल आणि धनश्रीने दोघांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या चहल आणि धनश्रीच्या लग्नाचे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत. ऑगस्ट महिन्यात चहल आणि धनश्रीने साखरपुडा केला होता. चहलने दिलेल्या या गोष्ट बातमीनंतर चाहत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे.
दरम्यान आयपीएल २०२० मध्ये चहल आणि धनश्री एकत्र युएईमध्ये होते. सामन्यादरम्यान धनश्री चहलची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला सपोर्ट करताना दिसली होती. चहल आणि धनश्रीच्या लग्नाच्या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटीच्या लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पडत आहे.
पाहा चहलच्या लग्नाच्या पोस्टवरील मजेशीर प्रतिक्रिया
Woo Yuzi….
Congrats…. pic.twitter.com/rW4LlkxqN5— 𝐃𝐢𝐧𝐞𝐬𝐡 𝐏𝐮𝐫𝐛𝐢𝐲𝐚 (@DiPuStats) December 22, 2020
Concussion substitute pic.twitter.com/e0RqDFEcMJ
— siva kumar (@sivakumar_009) December 22, 2020
Aur Yuzi bhai aapki bhi shaadi ho gyi 🤧
Ab bus mai bach gya hu akela pic.twitter.com/5HY1EvY0Ei— 𝐒𝐊 ♡̷̷ˎˊ (@shashi_kant7) December 22, 2020
After seeing this ..
Le Single me :-😭 pic.twitter.com/PUqAfYPicu— Jay_ (@The_Dhan_an_jay) December 22, 2020
— shreyas iyer's necklace (@okayraghuvanshi) December 22, 2020
कोण आहे धनश्री वर्मा?
युजवेंद्र चहलची बायको एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि युट्यूबर आहे. धनश्री नेहमी सोशल मीडियावर आपले डान्स व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या डान्स व्हिडिओला खूप लाईक्स आणि कमेंट्स असतात. तसेच ती स्वतः डान्सची धनश्री धर्मा कंपनी चालवते. इन्स्टाग्रामवर धनश्रीचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
दरम्यान फिरकीपटू युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे आणि टी-२० मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. पण चहल कसोटी मालिकेपूर्वी भारतात परतला होता.
हेही वाचा – यासाठीच थायलंडच्या राजाच्या गर्लफ्रेंडचे हजारो न्यूड फोटो झाले व्हायरल