घरताज्या घडामोडीपराभवाचे कारण शोधण्यासाठी शेलार विदर्भ दौऱ्यावर

पराभवाचे कारण शोधण्यासाठी शेलार विदर्भ दौऱ्यावर

Subscribe

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पराभव का झाला? या मागील कारण शोधण्यासाठी आशिष शेलार विदर्भ दौऱ्यावर गेले आहेत.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपाच्या झालेल्या दारुण पराभवानंतर भाजप नेते आशिष शेलार कामाला लागले आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पराभव का झाला? या मागील कारण शोधण्यासाठी शेलार विदर्भ दौऱ्यावर गेले आहेत. शेलार यांना भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आशिष शेलार तीन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळपासून भाजपाच्या जवळपास ८० पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी नागपूरमधील कामे आटोपल्यानंतर ते उद्या अमरावतीत जाणार आहेत.

पराभवाचे सत्य शोधण्याची दिली जबाबदारी

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला विदर्भातील नागपूर आणि अमरावती दोन्ही जागांवर अपयश आले होते. या पराभवाचे सत्य काय आहे हे शोधण्यासाठी आशिष शेलार यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शेलार सध्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकीत पुणे आणि मराठवाड्यातही पक्षाला अपयशाला समोरे जावे लागले. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींकडून भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाचे कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात जाऊन चिंतन करण्यास भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगण्यात आले आहे.

तर नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी प्रामुख्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. पुण्यातील दोन्ही जागा जिंकण्याचं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारलं होतं. तसेच दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याची जागा खेचून आणण्याचा विडा उचलला होता. मात्र, पाचही जागांवर पक्षाला पराभवाचा फटका बसला.

- Advertisement -

विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर निकाल

पुणे पदवीधर – अरुण लाड (राष्ट्रवादी)
पुणे शिक्षक – जयंत आसगावकर (काँग्रेस)
नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस)
औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी)
अमरावती शिक्षक – किरण सरनाईक (अपक्ष)
धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य – अमरिश पटेल (भाजप)


हेही वाचा – सुशांतची हत्या की आत्महत्या? देशमुख यांचा सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -