घरताज्या घडामोडीकाय सांगताय? 'शिवशाही' कॅलेंडरवर उर्दू भाषेत मजकूर; फोटो व्हायरल

काय सांगताय? ‘शिवशाही’ कॅलेंडरवर उर्दू भाषेत मजकूर; फोटो व्हायरल

Subscribe

'शिवशाही' कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांसोबतच हिरव्या रंगात उर्दू भाषेतील मजकूर समोर आला आहे. त्यामुळे शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे.

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेना नेहमीच आक्रमक असते. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो ‘शिवशाही’ कॅलेंडरचा असून त्यावर चक्क मराठी भाषा उर्दू भाषा असल्याचे समोर आले आहे. इंग्रजी महिन्यांसोबतच हिरव्या रंगात उर्दू भाषेतील मजकूर त्यात लिहिण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे आहे?, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. भाजपा नेत्यांकडून देखील शिवसेनेवर जोरदार टीकाही केली जात आहे.

शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही

भाजपचे नेते अतुल भातखळकर शिवसेनेवर टीका करण्याची संधी कधीही सोडत नाहीत. त्यांनी आज देखील ‘शिवशाही’ कॅलेंडरवरुन टीका केली आहे. त्यांनी या कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. या कॅलेंडरच्या वरच्या दोन कोपऱ्यांमध्ये शिवसेना आणि युवासेना, असेही नमूद करण्यात आले आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे हे कॅलेंडर मराठी, इंग्रजी याचसोबत उर्दू भाषेतही आहे. कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. याच कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत ‘शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही’, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी ‘आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही’, असे विधान केले होते. त्यावरुन आता अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.


हेही वाचा – FASTag साठी मुदतवाढ, 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवली तारीख

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -