घरताज्या घडामोडीपुणे जिल्ह्यात ५५ लसीकरण केंद्र निश्चित; लवकरच लस होणार उपलब्ध

पुणे जिल्ह्यात ५५ लसीकरण केंद्र निश्चित; लवकरच लस होणार उपलब्ध

Subscribe

पुणे शहर आणि जिल्ह्यात लसीकरणाची तयारी करण्यात आली असून पुणे जिल्ह्यात ५५ लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.

देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला येत्या १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. याकरता राज्य सरकार देखील सज्ज झाले असून पुणे शहर आणि जिल्ह्यात लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ५५ ठिकाणी लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे पुण्यात येत्या बुधवारी रात्री किंवा गुरुवापर्यंत लस उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

४३ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार

पुण्यात लसीकरण निश्चित करण्यात आली असली तरी देखील सरकारच्या सूचनेनुसार त्यात बदल केले जाणार आहेत. जिल्ह्यात ९५ हजार जणांची नोंदणी करण्यात आली आहे. तर आज, मंगळवारी सायंकाळपर्यंत उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोंदणीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात २३, पुणे महापालिका परीसरात १६ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात १६ संभाव्य केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच ग्रामीण भागात एकूण ४३ हजार ३५६ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.

- Advertisement -

केंद्रावर १०० जणांचे लसीकरण

पुण्यात एकूण ५५ केंद्र असून प्रत्येक केंद्रावर १०० जणांचे लसीकरण केले जाणार आहे. याकरता लोकसंख्येच्या प्रमाणात लस देण्यासाठी उपलब्ध कर्मचारी पाहता सुमारे ९० ते १०० दिवस लागण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १ लाख १० हजार आरोग्य कर्मचारी असून पुण्यातील एकाच केंद्रावर लस वितरित केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात लसीच्या साठवणुकीसाठी डीप फ्रीजरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.


हेही वाचा – १६ जानेवारीपासून लसीकरण सर्व राज्यांनी अफवांना आळा घालावा – पंतप्रधान


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -