घरCORONA UPDATEराज्यात शनिवारपासून ३५८ केंद्रांवर कोरोना लसीकरण

राज्यात शनिवारपासून ३५८ केंद्रांवर कोरोना लसीकरण

Subscribe

५११ पैकी १५३ केंद्र केले कमी, सर्वाधिक केंद्र मुंबईत

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना लसीकरणाला महाराष्ट्रात १६ जानेवारीपासून सुरुवात होते आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने लसीकरणाची ३५८ केंद्र निश्चित केली असून, यापूर्वीच्या ५११ पैकी १५३ केंद्र कमी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात अहमदनगरात २१, अकोला – ५, अमरावती – ९, औरंगाबाद – १८, बीड -९, भंडारा – ५, बुलढाणा – १०, चंद्रपूर – ११, धुळे – ७, गडचिरोली – ७, गोंदिया – ६, हिंगोली – ४, जळगाव – ८, जालना – ८, कोल्हापूर – २०, लातूर – ११, मुंबई – ७२, नागपूर – २२, नांदेड – ९, नंदुरबार – ७, नाशिक – २३, उस्मानाबाद – ५, पालघर – ८, परभणी – ५, पुणे – ५५, रायगड – ७, रत्नागिरी – ९, सांगली – १७, सातारा – १६, सिंधुदूर्ग – ६, सोलापूर – १९, ठाणे – ४२, वर्धा – ११, वाशिम – ५, तर यवतमाळ जिल्ह्यात ९ केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, लसीकरण केंद्रांच्या नव्या यादीनुसार सर्वाधिक आकडेवारी बघता मुंबईतील २२, पुण्यातील १६, ठाण्यातील १३ केंद्र कमी करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -