घरमनोरंजनमालदीवच्या बीचवर बिकनीमध्ये एन्जॉय करताना दिसली सारा; नेटिझन्स फिदा

मालदीवच्या बीचवर बिकनीमध्ये एन्जॉय करताना दिसली सारा; नेटिझन्स फिदा

Subscribe

सोशल मीडियावर साराच्या हॉट लूकची होतेय चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या मालदीव येथे तिच्या कुटुंबासह एन्जॉय करत आहे. सारा जेव्हा मालदीवमध्ये पोहोचली तेव्हापासून ती तिच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. चाहत्यांसाठी कनेक्ट राहण्यासाठी सारा मालदीवचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना सोशल मीडियावर दिसतेय. नुकतेच साराने तिचे मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत असल्याने तिने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. साराने तिचे बिकनीमधील हॉट फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर साराच्या या हॉट लूकची चांगलीच चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

 साराने शेअर केलेल्या हॉट फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत असून त्यात साराने निळ्या रंगातील स्विमसूट घालता असून या फोटोमध्ये ती पोज देताना दिसतेय. दुसऱ्या फोटोंमध्ये सनग्लासेस घातलेले तर काही फोटोमध्ये ती समुद्र किनाऱ्यावर निसर्गाच्या सानिध्यात तिचा वेकेशन काळ एन्जॉय करताना दिसतेय. सध्या सोशल मीडियावर साराचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत असून चाहत्याच्या पसंतीस ते फोटो उतरत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

- Advertisement -

मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील साराच्या लूकला नेटिझन्सने पसंती दिली असून त्यावर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडताना दिसतंय. साराने हे फोटो शेअर करताना ‘वरती आकाश आणि खाली वाळू’ असे कॅप्शन देखील दिले आहेत. आपल्या कुटुंबासह मालदीवमध्ये वेकेशन एन्जॉय करत असताना सारा अली खान सायकलिंग करताना देखील दिसली होती. याचा व्हिडिओ साराने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला होता.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -