घरताज्या घडामोडी'एअर स्ट्राइक'बाबत अर्णबला कस कळले? उत्तर द्या

‘एअर स्ट्राइक’बाबत अर्णबला कस कळले? उत्तर द्या

Subscribe

एअर स्ट्राईकची माहिती रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना कशी मिळाली? याबाबतचे केंद्राने उत्तर द्यावे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

पुलवामा येथे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी १४ फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून जैशचा दहशतवादी प्रशिक्षण स्थळ उध्वस्त केले. परंतु, भारताकडून होणाऱ्या एअर स्ट्राईकची माहिती रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना कशी मिळाली? याबाबतचे केंद्राने उत्तर द्यावे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.

देशाच्या सुरक्षेची माहिती लिक

पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये मोठी कारवाई होणार असल्याची माहिती तीन दिवसांपूर्वी लिक झाली होती. देशाच्या सुरक्षेच्या संबंधीत माहिती लिक कशी होते? ही माहिती लिक कोणी केली? याबाबत केंद्र सरकारने मौन बाळगले असून याबाबत केंद्र सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी गृहमंत्र्यांनी केली आहे.

- Advertisement -

२६ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘एअर स्ट्राइक’ झाले. मात्र, याबाबत रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी तीन दिवसांपूर्वी म्हणजे २३ फेब्रुवारी रोजी मोठी कारवाई होणार असल्याचे जाहीर केले. ही माहिती त्यांच्यापर्यंत कोणी पुरवली. त्यांनाच याची माहिती कशी मिळाली, याचा खुलासा केंद्र सरकारने अद्याप केलेला नाही. पंतप्रधान, संरक्षण मंत्री, सैन्य प्रमुख आणि सुरक्षा सल्लागारांसह मोजक्या काही मंत्र्यांना याबाबत माहिती होती. त्यानंतरही ही माहिती लिक कशी झाली. बार्कच्या अध्यक्षांसोबत whatsapp चॅटमध्ये गोस्वामी यांनी बालाकोटमध्ये मोठी घटना होण्याचा उल्लेख केला आहे. या चॅटमध्ये देशाच्या सुरक्षेसंबंधी गंभीर मुद्दे आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेशी संबंधित माहिती लिक झाल्याबाबत केंद्र सरकारने खुलासा करायला हवा आणि ज्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे. त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करणार याबाबतही केंद्राने स्पष्ट करायला हवे, असेही देखमुख पुढे म्हणाले.


हेही वाचा – शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या – शरद पवार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -