घरदेश-विदेशसिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभूणे यांना पद्मश्री

सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभूणे यांना पद्मश्री

Subscribe

शिंजो अ‍ॅबे, एस. पी. बालसुब्रह्मण्यम् यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

अनाथांची आई बनून त्यांना नवे जीवन देणार्‍या सिंधुताई सपकाळ आणि समाज सेवक गिरीश प्रभूणे यांच्यासह १०७ जणांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या व्यतिरिक्त जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे, गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम् (मरणोत्तर) यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (सर्व मरणोत्तर), लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह १० जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पद्मविभूषण : शिंजो अ‍ॅबे (सार्वजनिक कामकाज), एस. पी. बालसुब्रम्हण्यम् (कला), डॉ. बेल्ले मोनप्पा हेगडे (औषध), नरिंदर सिंग कपानी (मरणोत्तर -विज्ञान, तंत्रज्ञान), मौलाना वाहिदुद्दीन खान (अध्यात्म), बी. बी. लाल (पुरातत्त्व), सुदर्शन साहू (कला).

- Advertisement -

पद्मभूषण : कृष्णा नायर (कला), तरुण गोगोई (मरणोत्तर -सार्वजनिक कामकाज), चंद्रशेखर कंबारा (साहित्य, शिक्षण), सुमित्रा महाजन (सार्वजनिक कामकाज), नृपेंद्र मिश्रा (नागरी सेवा), राम विलास पासवान (मरणोत्तर -सार्वजनिक कामकाज), केशुभाई पटेल (मरणोत्तर -सार्वजनिक कामकाज), कलबे सादीक (मरणोत्तर -अध्यात्म), रजनीकांत श्रॉफ (व्यापार, इंडस्ट्रीज), तारलोचंद सिंग (सार्वजनिक कामकाज)

पद्मश्री (महाराष्ट्र) : परशुराम आत्मराम गंगावणे (कला), नामदेव कांबळे (साहित्य, शिक्षण), जसवंतीबेन पोपट (व्यापार, इंडस्ट्रीज), गिरीश प्रभूणे (समाजसेवा), सिंधुताई सपकाळ (समाजसेवा).

- Advertisement -

राज्यातील पाच मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार

 भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले जातात.यंदा देशभरातील 32 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुले पुरस्कार विजेते ठरले आहेत.

त्यामध्ये धाडशी कामगिरीचा शौर्य पुरस्कार – कामेश्वर जनन्नाथ वाघमारे (जि. नांदेड) याला मिळाला आहेत. तर नवनिर्माणासाठी – श्रीनभ अग्रवाल (नागपूर) आणि अर्चित राहूल पाटील (जळगाव) यांना पुरस्कार मिळाले आहे. त्याशिवाय शैक्षणिक प्रकल्पासाठी- सोनित सिसोलेकर (पुणे) आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी – काम्या कार्तिकेयन (मुंबई) यांना पुरस्कार मिळाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्वर वाघमारे या 14 वर्षीय बहादूर मुलाने आपल्या जीवाची पर्वा नदीत बुडणार्‍या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता. या धाडसाचे मुख्यमंत्र्यांनी याआधीच कौतुक केले होते. या धाडसाबद्दल त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -