घरताज्या घडामोडीपण गृहमंत्र्यांनी तसं करायला नको होतं...रक्षा खडसे

पण गृहमंत्र्यांनी तसं करायला नको होतं…रक्षा खडसे

Subscribe

रक्षा खडसेंची गृहमंत्र्यांवर नाराजी

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल अक्षेपार्ह उल्लेख केल्यामुळे राज्याीतल राजकारणात खळबळ माजली आहे. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरच असा प्रकार घडल्याने राजकीय चर्चांणा उधाण आले होते. वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा चुकीचा उल्लेख करण्यात आाल आहे. या प्रकाराची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रक्षा खडसे यांच्या अक्षेपार्ह मजूकाराचा फोटो आपल्या ट्विटमध्ये जोडल्याने गृहमंत्र्यांवर टीकेची झोड उठली आहे. यावर भाजपच्या रक्षा खडसे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. रक्षा खडसे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्यावर नाराजीही व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. असे रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

रक्षा खडसेंची गृहमंत्र्यांवर नाराजी

गृहमंत्र्यांनी प्रकरणाची दखल घेतल्यामुळे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी अनिल देशमुख यांचे आभार मानले आहेत. तर गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटरवरुन आक्षेपार्ह मजकूर पुन्हा ट्विट केल्यामुळे रक्षा खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गृहमंत्र्यांनी अक्षेपार्ह मजकूर वगळायला पाहिजे होता. ती पोस्ट पुन्हा शेअर करायला नको होती त्यामुळे मला गृहमंत्र्यांचे ते ट्विट खटले असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. राजकारणात चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात त्यामुळे या प्रकरणाची चौकशी निश्चितच होईल. परंतु कुठल्याच महिलेची बदनामी करण्याचे कृत्य सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल होईला नको असेही रक्षा खडसेंनी म्हटले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते गृहमंत्री

भाजपच्या वेबसाईटवर भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याबाबतच्या अक्षेपार्ह मजकूर प्रकरणाची दखल घेत गृहमंत्र्यांनी ट्विट केले होते. भाजपाने संबंधित दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार महिलांचा अवमान करणाऱ्या अशा दोषींची गय करणार नाही. असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी अक्षेपार्ह मजकूर वापरला होता.

काय आहे अक्षेपार्ह मजकूर

भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व खासदारांचे फोटो आणि नावांची यादी आहे. या यादीला हिंदी आणि इंग्रजी भाषांतर असे पर्याय आहेत. यामध्ये हिंदी असा पर्याय निवडल्यास रक्षा खडसे यांच्या नावाचा उल्लेख श्रीमती रक्षा खडसे, रावेर(महाराष्ट्र) असा मजकूर दाखवत आहे. तर याचे इंग्रजी भाषांतराचा पर्याय निवडल्यास रावेर या मराठी शब्दाचा इंग्रजी भाषांतर होमोसेक्सुअल असे दाखवत आहेत. म्हणून हा एकंदरीत भाषांतराचा घोळ असल्याचे दिसत आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -