घरट्रेंडिंगभारतीय रिझर्व्ह बँकेत ३२२ जागांसाठी भरती; असा करु शकता अर्ज

भारतीय रिझर्व्ह बँकेत ३२२ जागांसाठी भरती; असा करु शकता अर्ज

Subscribe

'ग्रेड बी अधिकारी' पदासाठी राबवली जातेयं भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी ३२२ जागांची भरती केली जाणार आहे. या पदाच्या भरतीकरिता उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. १५ फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. एस.एसटी श्रेणीतील उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्यासाठी १०० रुपये शुल्क भरावा लागणार आहे तर खुल्या प्रवर्गातील, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. जर तुम्ही सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचारी म्हणून काम करत असाल आणि या पदासाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/rbiscsgjan21/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज भरु शकता. यापदांसाठी मुख्यत्वे अर्थशास्त्र, गणित शास्त्र, एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात पदव्युत्तर पदवी, इकोनोमेट्रिक्ससह आयआयटी संबंधित शैक्षणिक पात्रता असणे गरजेच आहे. ऑफिसर ग्रेड बी (डीआर) जनरल पदांसाठी पदवीधर तरूणांना अर्ज करता येईल. उमेदवारांची निवड सुरूवातीला होणारी परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही खालील पीडीएफ फाईलचा आधार घेऊ शकता.

- Advertisement -

पीडीएफ फाईल
https://drive.google.com/file/d/1fZsD5wd0bAshMtFe-fhwTaQKXG2MRX2Q/view

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -