घरताज्या घडामोडीसरकारला चिंता कोणाची? मुंबईकरांची की बारबालांची? - राम कदम

सरकारला चिंता कोणाची? मुंबईकरांची की बारबालांची? – राम कदम

Subscribe

भाजपचे नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला असून सरकारला नक्की चिंता कोणाची मुंबईकरांची की बारबालांची असा सवाल केला आहे.

कोरोना व लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद करण्यात आलेली लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. मात्र कोरोनाचा धोका ओळखून ठराविक वेळेतच सामान्यांना लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला असून सरकारला नक्की चिंता कोणाची मुंबईकरांची की बारबालांची असा सवाल केला आहे.

यासंदर्भात राम कदम यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी जर राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय पाच महिन्यांपू्र्वीच घेतला असता तर लाखो लोकांचा त्रास वाचला असता. हजारो लोकांच्या नोकऱ्या वाचल्या असत्या. पण सरकारने तसे केले नाही . यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. असा आरोप या व्हिडीओत कदमांनी केला आहे. तसेच मंदिर उघडण्याआधी बार सुरू करणाऱ्या या सरकारने सामान्यांना रात्री साडेनऊनंतर लोकल प्रवेश करण्यास परवानगी दिली. याचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? या सरकारला नक्की चिंता कोणाची आहे ? सामान्य जनतेची की बारवाल्यांची असा थेट सवाल राम कदम यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. जनतेला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. पण सरकार कधी गंभीर होणार असेही ते म्हणाले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा - पण गृहमंत्र्यांनी तसं करायला नको होतं…रक्षा खडसे

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -