घरमहाराष्ट्रनाना पटोले आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

नाना पटोले आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. नाना पटोले आज दुपारी ४ च्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर नाना पटोले विधानभवानकेडे निघाले. त्यामुळे नाना पटोले आज राजीनामा देणार अशी शक्यता आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरु आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील १० जनपथ येथे राहुल गांधींची भेट घेतली. राहुल गांधींच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज नाना पटोले यांनी सह्याद्रीवर कॅबिनेट बैठकिच्या आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विधान भवनाकडे निघाले. यामुळे नाना पटोले राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -