घरताज्या घडामोडीLive Update: राज्यपाल भदतसिंह कोश्यारी यांचे विमान नाकारल्याप्रकरणी राजभवनाकडून स्पष्टिकरण

Live Update: राज्यपाल भदतसिंह कोश्यारी यांचे विमान नाकारल्याप्रकरणी राजभवनाकडून स्पष्टिकरण

Subscribe

राज्यपाल भदतसिंह कोश्यारी यांचे विमान नाकारल्याप्रकरणी राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उत्तराखंड दौऱ्याच्या तयारीच्या वेळी राज्यपाल सचिवालयाने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना राज्यपालांना सरकारी विमानाच्या वापरासाठी परवानगी मिळावी म्हणून २ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्र लिहिण्यात आले होते. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयालाही देण्यात आली होती. ११ फेब्रुवारीला राज्यपाल १० वाजता सीएसआयएम विमानतळावर पोहचले त्यानंतर त्यांना शासकीय विमानाच्या वापरासाठी परवानगी नाही असे सांगण्यात आले, असे राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


केरळमधील प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व प्रवाशांना त्यांच्या आरटी पीसीआर टेस्टची निगेटिव्ह चाचणीचा अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आदेश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोगेश्वरी रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेट ते विरार लोकलं १५ मिनिटे उशिराने असणार


मुंबई ठाणे आणि पुणे या भागात कांदा महागला आहे. मुंबईत कांदा ५५ ते ६० रुपये प्रति किलो झाले आहेत. कांद्याचे घाऊक दर ४० ते ४५ रुपये प्रति किलो आहेत. आवाक कमी झाल्याने कांदा महागल्याचे सांगितले जात आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा कांद्यावर परिणाम झाला आहे.

- Advertisement -

पंढरपूर शहरातील बाजारपेठेतील कर्नल भोसले चौक येथे पहाटे अचानक आग लागली. या आगीत काही दुकाने जळून खाक झाली. अग्निशमक दलाच्या जवानांना दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. योग्य वेळी आगीची माहिती मिळाल्याने धोका ठळला.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -