घरक्रीडाIPL 2021 Auction: आयपीएल लिलावात कोणत्या संघाने कोणाला केले खरेदी, जाणून...

IPL 2021 Auction: आयपीएल लिलावात कोणत्या संघाने कोणाला केले खरेदी, जाणून घ्या! 

Subscribe

क्रिस मॉरिस हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिस हा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. गुरुवारी झालेल्या आयपीएल खेळाडू लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल १६.२५ कोटी रुपयांत खरेदी केले आहे. याआधी हा विक्रम युवराज सिंगच्या नावे होता. त्याला २०१५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने १६ कोटी रुपयांत खरेदी केले होते. तसेच यंदाच्या लिलावात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायेल जेमिसन आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचीही चांदी झाली. जेमिसनला १५ कोटी रुपयांत, तर मॅक्सवेलला १४.२५ कोटी रुपयांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने खरेदी केले.

कोणत्या संघाने केले कोणाला खरेदी –

मुंबई इंडियन्स : नेथन कुल्टर-नाईल (५ कोटी), अ‍ॅडम मिलने (३.२ कोटी), पियुष चावला (२.४ कोटी), जिमी निशम (५० लाख), युद्धवीर चरक (२० लाख), मार्को जेन्सन (२० लाख), अर्जुन तेंडुलकर (२० लाख)

- Advertisement -

पंजाब किंग्स : जाय रिचर्डसन (१४ कोटी), रायली मेरेडीच (८ कोटी), शाहरुख खान (५.२५ कोटी), मोईसेस हेन्रिक्स (४.२ कोटी), डाविड मलान (१.५ कोटी), फेबियन अ‍ॅलन (७५ लाख), जलज सक्सेना (३० लाख), उत्कर्ष सिंह (२० लाख),  सौरभ कुमार (२० लाख)

चेन्नई सुपर किंग्स : कृष्णप्पा गौतम (९.२५ कोटी), मोईन अली (७ कोटी), चेतेश्वर पुजारा (५० लाख), हरिशंकर रेड्डी (२० लाख), भगत वर्मा (२० लाख), हरी निशांत (२० लाख)

- Advertisement -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : कायेल जेमिसन (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (१४.२५ कोटी), डॅनियल क्रिस्टियन (४.८ कोटी), सचिन बेबी (२० लाख), रजत पटिदार (२० लाख), मोहम्मद अझरुद्दीन (२० लाख), सुयश प्रभुदेसाई (२० लाख), केएस भरत (२० लाख)

दिल्ली कॅपिटल्स : टॉम करन (५.२५ कोटी), स्टिव्ह स्मिथ (२.२ कोटी), सॅम बिलिंग्स (२ कोटी), उमेश यादव (१ कोटी), रिपाल पटेल (२० लाख), विष्णू विनोद (२० लाख), लुकमन मेरीवाला (२० लाख), सिद्धार्थ (२० लाख)

कोलकाता नाईट रायडर्स : शाकिब अल हसन (३.२ कोटी), हरभजन सिंग (२ कोटी), बेन कटिंग (७५ लाख), करूण नायर (५० लाख), पवन नेगी (५० लाख), शेल्डन जॅक्सन (२० लाख), वैभव अरोरा (२० लाख), वेंकटेश अय्यर (२० लाख)

राजस्थान रॉयल्स : क्रिस मॉरिस (१६.२५ कोटी), शिवम दुबे (४.४ कोटी), चेतन सकारिया (१.२ कोटी), मुस्ताफिझूर रहमान (१ कोटी), लियम लिविंगस्टन (७५ लाख), केसी करिअप्पा (२० लाख), कुलदिप यादव (२० लाख), आकाश सिंग (२० लाख)

सनरायजर्स हैदराबाद : केदार जाधव (२ कोटी), मुजीब उर रहमान (१.५ कोटी), जगदीश सुचित (३० लाख)

 

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -