घरक्रीडा२०१४ इंग्लंड दौऱ्यातील अपयशामुळे डिप्रेशन आले होते - विराट कोहली 

२०१४ इंग्लंड दौऱ्यातील अपयशामुळे डिप्रेशन आले होते – विराट कोहली 

Subscribe

त्या इंग्लंड दौऱ्यात कोहलीला पाच कसोटी सामन्यांच्या एकही अर्धशतक करता आले नाही.

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा कोहली हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव फलंदाज आहे. कोहलीने सर्वच संघांविरुद्ध सर्वप्रकारच्या खेळपट्ट्यांवर दमदार कामगिरी केली आहे. परंतु, कोहलीला २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. या अपयशामुळे नैराश्य (डिप्रेशन) आल्याचे आता कोहलीने सांगितले आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क निकोलसने नुकतीच कोहलीची मुलाखत घेतली. यात कोहलीला २०१४ इंग्लंड दौऱ्याविषयी विचारण्यात आले. तुला या दौऱ्यातील अपयशानंतर नैराश्य आले होते का? असे विचारले असता कोहलीने ‘हो’ असे उत्तर दिले.

तुमच्या नियंत्रणात काहीच नसते

मला धावा करता येणारच नाहीत असे वाटू लागले होते. माझ्या मते, प्रत्येकच फलंदाजाच्या कारकिर्दीत असा एक टप्पा येतोच, जेव्हा त्याच्या धावा होत नाहीत. तुमच्या नियंत्रणात काहीच नसते. हेच माझ्याबाबतीत घडले, असे कोहली म्हणाला. कोहलीला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने चांगलेच अडचणीत टाकले होते. त्याला पाच कसोटी सामन्यांच्या १० डावांत एकही अर्धशतक करता आले नाही.

- Advertisement -

‘ही’ गोष्ट बदलायला आवडेल

माझ्या धावा होणारच नाहीत असे मला वाटत होते आणि यातून कसे बाहेर पडायचे हेसुद्धा समजत नव्हते. माझ्या आजूबाजूला मला पाठिंबा देणारे अनेक लोक होते. मात्र, असे असतानाही मला एकटा पडल्यासारखे वाटत होते. मला बहुधा मानसोपचार तज्ज्ञांची गरज होती. माझी परिस्थिती त्यांना समजू शकली असती. मागे वळून पाहताना मला या गोष्टीत बदल करायला आवडेल, असेही कोहलीने या मुलाखतीत सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -