घरमुंबईपूजा चव्हाणच्या हत्याऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, चित्रा वाघ यांची मागणी

पूजा चव्हाणच्या हत्याऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, चित्रा वाघ यांची मागणी

Subscribe

वनमंत्री संजय राठोडच पूजा चव्हाणच्या आत्महत्येला जबाबदार

पूजा चव्हाणच्या हत्याऱ्याची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधक करत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सातत्याने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. तब्बल १५ दिवसांनंतर वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत मी निर्दोष आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा ट्विट करत महाराष्ट्राच्या कन्येच्या हत्याऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जो बोया है..वही पायेगा, तेरा किया आगे आयोगा, महाराष्ट्राची जाँबाज़ लेक पूजा चव्हाणच्या हत्याऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा आशयाचे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. तसेच #JusticeForPoojaChavan हे हॅशटॅगही वापरले आहे.

- Advertisement -

वनमंत्री संजय राठोडच पूजा चव्हाणच्या आत्महत्येला जबाबदार असून संजय राठोडच पूजाचा हत्यारा आहे. स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे वनमंत्री संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तसेच बंजारा समाजाबद्दल आपल्या आदर आहे. परंतु आपण शेण खायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे योग्य नाही. राज्य सरकारचे मंत्रीही बलात्काऱ्यांना पाठीशी घालतात हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणार नाही अशी खोचक टीकाही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -