घरदेश-विदेश५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर; EC ची आज महत्त्वपूर्ण बैठक

५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा होणार जाहीर; EC ची आज महत्त्वपूर्ण बैठक

Subscribe

पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभेचे वेळापत्रक ठरवण्यासाठी निवडणूक आयोग आज, बुधवारी दिल्लीत बैठक घेणार

पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभेचे वेळापत्रक ठरवण्यासाठी निवडणूक आयोग आज, बुधवारी दिल्लीत बैठक घेणार आहे. या बैठकीत ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असल्याची शक्यता आहे, पाच राज्यांमधील निवडणुकांदरम्यान कोरोनापासून संरक्षण, सुरक्षा दलाची संख्या, मतदान केंद्राशी संबंधित मुद्द्यांवर विचार करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वात आज सकाळी साडेअकरा वाजता ही बैठक होणार आहे. यावर्षी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुचेरी, आसाम आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. कोरोनानंतर प्रथमच देशात इतक्या मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी बिहारमधील कोरोना दरम्यान निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका घेतल्या होत्या.

तामिळनाडूमध्ये सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २४ मेपर्यंत आहे तर पश्चिम बंगालमध्ये ३० मेपर्यंत आणि आसाममध्ये ३१ मेपर्यंत आहे. तर केरळमध्ये १ जूनपर्यंत कार्यकाळ आहे, तर पुदुचेरीत असणाऱ्या सध्याच्या सरकारचा कार्यकाळ ८ जूनपर्यंत आहे.

- Advertisement -

तसेच निवडणूक आयोगाच्या बैठकीत पश्चिम बंगालवर विशेष चर्चा होणार आहे. आयोगाच्या मते, येथे ६ हजार ४०० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी या विधानसभेचा कार्यकाळ या वर्षाच्या मे आणि जूनमध्ये वेगवेगळ्या वेळी संपत आहे. येत्या एप्रिल-मेमध्ये या ठिकाणी विधानसभा निवडणुका होऊ शकतात. कोरोनाच्या साथीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम लक्षात घेऊन आयोग या राज्यांमधील मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याच्या शक्यता आहे.

- Advertisement -

उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन गुरुवारी दोन दिवसांच्या बंगाल दौर्‍यावर असल्याची माहिती आहे. सुरक्षेसाठी ५ राज्यात किमान २५ हजार जवान तैनात असतील. यामध्ये सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ आणि एसएसबीच्या २५० कंपन्यांचा समावेश आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -