घरमुंबई...तर अनधिकृत फेरीवाल्यांना १० हजारांचा दंड; कठोर कारवाईचे धोरण आयुक्तांकडे मंजुरीसाठी

…तर अनधिकृत फेरीवाल्यांना १० हजारांचा दंड; कठोर कारवाईचे धोरण आयुक्तांकडे मंजुरीसाठी

Subscribe

भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी मागील वर्षी विधी समितीच्या बैठकीत मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेने कडक कारवाईची मागणी केली होती. 

मुंबईत रस्ते, पदपथ, रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना पालिकेच्या धाडीत पुढील काळात तब्बल १० हजार रुपयांपर्यंत हा दंड भरावा लागणार आहे. तसेच, वारंवार पकडल्यास त्या फेरीवाल्यांना ओळखपत्र जमा करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे यापुढे रात्री दहा वाजेपर्यंत पालिकेकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतच्या सुधारित धोरणाला पालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतरच कारवाई सुरू करण्यात येणार आहे. भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी मागील वर्षी ९ जानेवारीला विधी समितीच्या बैठकीत मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेने कडक कारवाईची मागणी केली होती.

पालिका नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणाऱ्यांकडून किमान ८-१० हजार रुपयांचा दंड वसूल करते. मात्र, रस्ते, पदपथ याठिकाणी अनधिकृत फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना चाप लावण्यासाठी ठोस व कडक कारवाई करण्यात येत नसल्याने फेरीवाले कारवाईनंतरही पुन्हा त्याच ठिकाणी फेरीवाला व्यवसाय करतात. त्यामुळे या फेरीवाल्यांना कायमचा चाप लावण्यासाठी पालिकेने कडक कारवाई करावी, अशी मागणी अभिजित सामंतयांनी केली होती.

- Advertisement -

तसेच नो पार्किंग मधील वाहनांना ज्याप्रमाणे जबर दंड आकारण्यात येतो, त्याप्रमाणे जप्त माल सोडविताना त्यांना जास्तीत जास्त दंड करण्यात यावा. तसेच, सदर फेरीवाला हा कुठे राहतो आणि तो वारंवार एकाच ठिकाणी बसतो का? याची माहिती घेण्यासाठी त्याचे ओळखपत्राची (आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदी) प्रत जमा करणे बंधनकारक करावे. तसेच फेरीवाले संध्याकाळ नंतर रात्री उशीरापर्यंत व्यवसाय करीत असल्याने त्यांच्यावर रात्री वाजेपर्यंत कारवाई करण्यात यावी, असेही त्यावेळी मागणी करताना अभिजित सामंत यांनी केली होती.

पालिका प्रशासनाने समाधानकारक उत्तर न दिल्याने सामंत यांनी मंगळवारी (आज) विधी समितीच्या बैठकीत ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत सकारात्मक उत्तर दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा हट्ट धरला. अखेर पालिकेने नमते घेत अनधिकृतपणे फेरीवाला व्यवसाय करणाऱ्यांवर वरीलप्रमाणे धोरण बनवून कारवाई करण्याबाबत सकारात्मक उत्तर दिले. त्यानंतर सामंत यांनी आंदोलन मागे घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -