घरमनोरंजनमराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा झिम्मा

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा झिम्मा

Subscribe

मराठी कलाकार घेऊन येत आहेत मनोरंजनाचा झिम्मा

सध्या सोशल मीडियावर मराठी कलाकारांच्या ‘झिम्मा’ची  फार चर्चा होताना दिसत आहे. झिम्मा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांनी सोशल मीडियावर याचित्रपटाचे पोस्ट शेअर केले आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स निर्मित झिम्मा या चित्रपटाचे लेखन  केले आहे. तर इरावती कर्णिक आणि अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.  सोनाली कुलकर्णी, क्षिती जोग, सुहास जोशी , सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत हे दमदार कलाकार सिनेमात पहायला मिळणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

नव्या वर्षात खेळू आनंदाचा खेळ अशी ह्या चित्रपटाची टॅगलाइन आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील स्टारकास्ट पाहता ‘झिम्मा’ कमाल आणि कौटुंबिक मनोरंजन करणारा असणार असे दिसत आहे. पोस्टरमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील अभिनेत्रींमध्ये सिद्धार्थ एकमेव तरुण अभिनेता आहे. यावरुन झिम्मा मध्ये काहीतरी वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळणार असा अंदाज प्रेक्षकांना येतोय. त्यामुळे आता झिम्मा मध्ये काय असणार हे पाहण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शुभांगी सदावर्ते साकारणार ‘नवे लक्ष्य’ मालिकेत पीआयची भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -