घरमुंबईराज्याच्या अर्थसंकल्पात 'या' घोषणा होण्याची शक्यता, नागरिकांना दिलासा मिळणार?

राज्याच्या अर्थसंकल्पात ‘या’ घोषणा होण्याची शक्यता, नागरिकांना दिलासा मिळणार?

Subscribe

कृषी क्षेत्रासंबंधित अनेक योजनाही जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पात होईल.

राज्यात महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प आज ( सोमवार, ८ मार्च) सादर करण्या येणार आहे. विधानसभेत दुपारी २ वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. राज्या गेल्या ८ दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करात आणि सेसमध्ये घट होणार का? याकडे साऱ्या जनतेचे लक्ष लागले आहे. महसूल, उच्च शिक्षण आणि गृह अशा विभागांशी संबंधित बिले हाती घेण्याची शक्यता आहे. कोरोना काळानंतर पहिलाच अर्थसंकल्प आज सादर करण्यात येणार आहे. कोरोनामुळे राज्याच्या महसुलात मोठी तुट निर्माण झाले त्यामुळे ही तुट अर्थसंकल्पात कशी भरुन काढणार तसेच कृषी विभागाबाबातही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी जनतेला महागाईपासून दिलासा मिळणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता अजित पवार नागरिकांना दिलासा देणाऱ्या कोणत्या घोषणा करणार यावरही साऱ्यांचे लक्षकेंद्रित झाले आहे. राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार अधिवेशनात विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.

- Advertisement -

राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली असून इंधनाचे दर शंभरीपार गेले आहेत. त्यामुळे इंधनाच्या दरातील करात घट करुन नागरिकांना दिलासा देण्याची शक्यता आहे. आर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला उभारणी देण्यासाठी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि मत्स्त्य शेतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते आहे. तर कृषी क्षेत्रासंबंधित अनेक योजनाही जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पात होईल.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -