घरताज्या घडामोडीCorona Update: देशात सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार पार!

Corona Update: देशात सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार पार!

Subscribe

देशात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या आठ राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी देशात १८ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मागील २४ तासांत देशात १८ हजार ५९९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ९७ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १२ लाख २९ हजार ३९८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५७ हजार ८५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

तसेच मागील २४ तासांमध्ये १४ हजार २७८ रुग्ण बरे होऊन गेले असून आतापर्यंत देशातील १ कोटी ८ लाख ८२ हजार ७९८ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १ लाख ८८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जगातील कोरोना बळींची संख्या २६ लाख पार!

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ११ कोटी ७४ लाख ४९ हजार पार गेली आहे. यापैकी आतापर्यंत २६ लाख ५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ९ कोटी २९ लाख ६४ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Corona: अधिवेशनावर कोरोनाचं आणखीन गडद सावट: पुन्हा ३६ जण आढळले ‘पॉझिटिव्ह’


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -